आजची वात्रटिका
-----------------------
भ्रष्टाचार निर्मूलन
घेणारालाही नको आहे,
देणारालाही नको आहे.
भ्रष्टाचार निर्मूलनाचा ,
कार्यक्रम धूळ फेको आहे.
चरणाराला गोड वाटते,
चारणाराला गोड वाटते.
नव्या नव्या गिऱ्हाईकाची,
रोज नव्याने ओढ वाटते.
खोटे हवे, पटकन हवे,
थांबायला कुठे वेळ आहे!
सहकार ते स्वाहाकार,
भ्रष्टाचाराचा खेळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6419
दैनिक पुण्यनगरी
23फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment