Tuesday, February 8, 2022

सुट्टीचा बोनस.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
सुट्टीचा बोनस
सुट्टीखोरांची होते चंगळ,
देशाचा मात्र घाटा होतो.
सुट्टी जाहीर झाली की,
दुखवट्याचा सुखवटा होतो.
राष्ट्रीय दुखवट्यांची सुट्टी,
सुट्टीखोरीला पूरक आहे!
सुट्ट्यांचा हा बोनस,
देशहितासाठी मारक आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7838
दैनिक झुंजार नेता
8फेब्रुवारी 2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...