आजची वात्रटिका
----------------------------
घोटाळ्यांचे आकडेशास्त्र
आरोपांवर आरोप ऐकून,
नको ते वास येऊ लागले.
आपणच आरोपी असल्याचे,
भासावर भास होऊ लागले.
घोटाळ्यांचे आकडे ऐकून,
आकडी यायची शक्यता आहे !
घोटाळ्यांचे आकडे मोजताना,
चूकही व्हायची शक्यता आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7845
दैनिक झुंजार नेता
16फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment