आजची वात्रटिका
----------------------------
सेम टू सेम
असा तर एकही प्रेमवेडा नसेल,
ज्याला खरे बोललेले झोंबत नाही.
आम्ही खात्रीपूर्वक सांगतो,
व्हॅलेंटाईन डे पर्यंत कोणी थांबत नाही.
प्रेमाला जशी उपमा नाही,
तसा प्रेमाला मुहूर्तही लागत नाही !
जगातले कोणतेही प्रेम,
कॅलेंडर वा पंचांग बघत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------ ---------
फेरफटका-7844
दैनिक झुंजार नेता
13फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment