आजची वात्रटिका
----------------------------
धर्म चिकित्सा
कुणी धार्मिक आहेत,
कुणी अधार्मिक आहेत.
यावरूनही ते महत्त्वाचे,
जे कुणी निधार्मिक आहेत.
जसा धर्म ही शक्ती आहे,
तशी धर्म ही उर्मी आहे.
तितकीच महत्त्वाची गोष्ट,
भारत हा निधर्मी आहे.
भारत निधर्मी असला तरी,
भारतीयत्व हाच धर्म आहे !
आपल्या भारतीयत्वाचे,
मानवता हेच खरे मर्म आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6406
दैनिक पुण्यनगरी
10फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment