आजची वात्रटिका
----------------------------
प्रेमाचा त्रिकोण
प्रेमाच्या त्रिकोणात,
सगळी लपवाछपवी असते.
लपवाछपवीच्या जोडीला,
सगळी खपवाखपवी असते.
चोरी चोरी,चुपके चुपके,
सगळ्या चोरांचा शोर असतो
काही पे असतात निगाहे ,
निशाणा किसी ओर असतो.
प्रेमाच्या त्रिकोणाचे
क्षेत्रफळही विसंगत असते!
त्रिकोणी प्रेमाचे राजकारण,
ही निव्वळ कुसंगत असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6402
दैनिक पुण्यनगरी
6फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment