आजची वात्रटिका
----------------------------
अविभाज्यता
ते म्हणतात, कट्टर समर्थक,
हे म्हणतात, लाचारांची फौज आहे.
दोघांच्याही विधानात,
किती वेगवेगळी मौज आहे.
कट्टरतेला लाचारी पासून,
कधीच वेगळे करता येत नाही!
लाचारी शिवाय कट्टरता,
कुणामध्ये कधी पेरता येत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7833
दैनिक झुंजार नेता
3 फेब्रुवारी 2022
No comments:
Post a Comment