Wednesday, February 23, 2022

आधुनिक राजकारण.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

आधुनिक राजकारण

राजकारणाचे बदलते संदर्भ,
सगळ्यांच्याच लक्षात येऊ लागले.
म्हणून तर कुणीही कुणाला,
आपापल्या पक्षात घेऊ लागले.

त्यांची राजकीय लवचिकता,
आपल्याला अनैतिकता वाटते आहे!
आपली वैचारिक ताठरता,
जणू आपलाच गळा घोटत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7851
दैनिक झुंजार नेता
23फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका29एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -327 वा

 दैनिक वात्रटिका 29एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -327 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Qdm8vBAFqaFmdkkt4Q3...