Monday, February 7, 2022

अखंड प्रेम नाम सप्ताह... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

अखंड प्रेम नाम सप्ताह

कुणी होतो कुणासाठी वेडा,
कुणी कुणासाठी वेडी असते.
प्रेमाच्या चॉकलेट साठी,
उतावळी बावरी टेडी असते.

हग डेला प्रॉमिस डे चे,
अगदी पक्के प्रॉमिस असते.
व्हॅलेंटाईन डे च्या अगोदर,
किस डे ची घासाघीस असते.

रोज नवा डे,नवीन नाव,
प्रेमाला मुजरा केला जातो !
अखंड प्रेम नामाचा सप्ताह,
फेब्रुवारीत साजरा केला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7837
दैनिक झुंजार नेता
7फेब्रुवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...