Thursday, February 3, 2022

बेवडेबाजी.....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

बेवडेबाजी

लोकांची तर खात्री होतीच,
सगळेच बोलघेवडे आहेत.
आरोप प्रत्यारोप सुरू झाले,
कुणाकडे किती बेवडे आहेत?

आमच्याकडे कमी आहेत,
त्यांच्याकडे जास्त आहेत !
बेवडा म्हणाला बेवड्याला,
पक्षा-पक्षात आपले दोस्त आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6399
दैनिक पुण्यनगरी
3फेब्रुवारी 2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...