Thursday, July 27, 2023

शोधा म्हणजे सापडेल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

शोधा म्हणजे सापडेल

माना डोलकर व थुंकी झेलकर,
यांचीच आजकाल चांदी आहे.
याचे खरे कारण हेही असू शकते,
मजबूरी का नाम गांधी आहे.

सदा वाके आणि लाळू पायचाटे,
सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
गोंडोजी घोळे, मेंढोजी बिनडोके,
माळेत अजून कुणी कुणी आहेत.

सर्डोजी रंगबदले यांची तर,
फकत कुंपणापर्यंतच धाव आहे !
माळेत तुम्हीही भर घालू शकता,
यात अजून कुणाकुणाचे नाव आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8312
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27जुलै जून2023
 

1 comment:

Anonymous said...

फार छान 👌

daily vatratika...5april2025