आजची वात्रटिका
--------------------
येरे.. येरे..पावसा !!
घोंगावणारे वादळही,
वाट वाकडी करू लागले.
वांझोटे काळे ढगसुद्धा,
मनातल्या मनात झुरू लागले.
थंडीचीही झाली कोंडी,
पावसाला तर आधीच ब्रेक आहे.
आता कसे म्हणावे?
हवामानाचा अंदाज फेक आहे?
अल निनो इफेक्टमुळे,
सगळे क्लायमेट चेंज आहे !
ग्लोबल वॉर्मिंग सांगू लागले,
बघा माझी काय रेंज आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष सहावे
अंक 99 वा
17 नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment