आजची वात्रटिका
----------------------------
तोच येतो हमखास निवडून
ज्याला धडधडीत खोटेसुद्धा,
चक्क खरे म्हणून ठसवता येते.
ज्याला स्वतःला सकट इतरांनाही,
अगदी उघड उघड फसवता येते.
ज्याला जनतेच्या दुःखावरती,
जनतेलाच खदाखदा हसवता येते.
ज्याला द्वेष आणि सूडाची आग,
मनामनात बदाबदा घुसता येते.
जो सपनोंका सौदागर होऊन,
मोठी व खोटी स्वप्न पेरू शकतो!
तोच येतो हमखास निवडून,
जो सगळी सौदेबाजी करू शकतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6407
दैनिक पुण्यनगरी
11फेब्रुवारी 2022
1 comment:
सर,
तुमच्या वात्रटिका वाचत वाचत वाढत गेलो। तुमची आदर्श लेखनशैली रोज नव्याने,वर्तमानात जगायला शिकवते।
सलाम
दंडवत तुम्हाला।
Post a Comment