Tuesday, March 22, 2022

फाईल्स.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
फाईल्स
क्लोज केलेल्या फाईली,
नव्याने ओपन होवू लागल्या.
दूरचे पाखरू टिपण्यासाठी,
फाईली गोफण होऊ लागल्या.
फायलींचा गोफणगुंडा बघून,
पक्षा-पक्षात खळबळ आहे!
ओठावर कळवळा असका तरी,
पोटात मात्र मळमळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7879
दैनिक झुंजार नेता
22मार्च 2022

 

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...