आजची वात्रटिका
----------------------------
फोटोलॉजी
चिम्या,गोम्या आणि सोम्या,
एकमेकांना ओवाळू लागले.
सत्काराचा एकच हार,
आळी-पाळीने माळू लागले.
तिघांनाही तिघांचे,
बघा कौतुक तरी किती आहे?
चिम्याकडून गोम्याची,
गोम्याकडू सोम्याची स्तुती आहे.
हे चिम्या,गोम्या आणि सोम्या,
तुमच्याकडेसुद्धा असू शकतात!
कुठेच नाही दिसले तर,
सोशल मीडियावर दिसू शकतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6448
दैनिक पुण्यनगरी
26मार्च 2022
1 comment:
अतिशय परखड विचारसरणी.. 👌👌💐💐🙏🏻
Post a Comment