आजची वात्रटिका
----------------------------
देखला दिवा
लोकप्रतिनिधींनी जनसेवा करावी,
गोष्टी सरळ आणि साध्या आहेत.
तरी कामदार आणि दमदार,
लोकप्रतिनिधींना उपाध्याआहेत.
कुणी खरोखरच हिरो आहेत,
कुणी मात्र पक्के झिरो आहेत.
कुणाचे फक्त ढोल ताशे,
कुणी फिडेलवाले नीरो आहेत.
बिरुदं लावा,उपाध्या लावा,
केवळ दबंगगिरीचा दावा नको !
आपलीच लाल करून घेत घेत,
तुमचा फक्त देखला दिवा नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6453
दैनिक पुण्यनगरी
31मार्च 2022
Thursday, March 31, 2022
मार्च एण्डचा पराक्रम.... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
मार्च एण्डचा पराक्रम
जो जो साचून राहिला,
तो सगळा सांडावा लागतो.
मार्च संपला की,
हिशोब चोख मांडावा लागतो.
लांड्या-लबाड्या करूनही,
सगळा हिशोब चोख असतो !
मार्च एण्डचा पराक्रम,
अगदी रोख-ठोक असतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7887
दैनिक झुंजार नेता
31मार्च 2022
Wednesday, March 30, 2022
संप एके संप... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
संप एके संप
एस.टी.वाल्यांच्या संपात,
लाईटवाल्यांची जंप आहे.
त्यांचा मिटत नाही तोपर्यंत,
आता यांचाही संप आहे.
एस.टी.वाल्यांचा अनुभव,
सगळ्यांच्या गाठीस आहे!
सरकार विरुद्धच्या नाराजीत,
सामान्य जनता वेठीस आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7886
दैनिक झुंजार नेता
30मार्च 2022
स्टंटबाजीचा तमाशा.... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
स्टंटबाजीचा तमाशा
काल होते,उद्याही असतील,
जसे की ते आज आहेत.
राजकीय स्टंट करणारे,
राजकीय स्टंटबाज आहेत.
लोकांनी चर्चा केली की,
स्टंटबाज चेकाळू लागतात.
सवंग प्रसिद्धीमुळे,
स्टंटबाज बोकाळू लागतात.
कुणाची स्टंटबाजी प्रायोगिक,
कुणाची स्टंटबाजी हौशी असते !
जशी मथुरेच्या बाजाराला,
गवळणीसोबत मावशी असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6452
दैनिक पुण्यनगरी
30मार्च 2022
Tuesday, March 29, 2022
टोलमुक्तीचे भविष्य...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
टोलमुक्तीचे भविष्य
नाके हटले गेले म्हणजे,
टोल हटणार असे नाही.
टोलमुक्तीचे डांगोरे तरी,
टोल मिटणार असे नाही.
फास्ट टॅगच्या घोळावर
जीपीआरएसचा उतारा आहे!
टोलमुक्तीच्या भविष्यावर
सॅटेलाईटचा पोतारा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6451
दैनिक पुण्यनगरी
29मार्च 2022
----------------------------
टोलमुक्तीचे भविष्य
नाके हटले गेले म्हणजे,
टोल हटणार असे नाही.
टोलमुक्तीचे डांगोरे तरी,
टोल मिटणार असे नाही.
फास्ट टॅगच्या घोळावर
जीपीआरएसचा उतारा आहे!
टोलमुक्तीच्या भविष्यावर
सॅटेलाईटचा पोतारा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6451
दैनिक पुण्यनगरी
29मार्च 2022
अजब तुझे सरकार.... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
अजब तुझे सरकार
कुणी उपाशी आहे,
कुणी तुपाशी आहे.
दाण्यांचे वैर आता,
पाखडणाऱ्या सुपाशी आहे.
काही सुपात आहेत,
काही जात्यात आहेत.
तीन तिघाडे,काम बिघाडे,
म्हणूनच गोत्यात आहेत.
धाकटे झाले थोरले,
थोरले आता धाकटे आहेत!
सत्ताधारी असूनही,
दिवस वाईट वकटे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7885
दैनिक झुंजार नेता
29मार्च 2022
----------------------------
अजब तुझे सरकार
कुणी उपाशी आहे,
कुणी तुपाशी आहे.
दाण्यांचे वैर आता,
पाखडणाऱ्या सुपाशी आहे.
काही सुपात आहेत,
काही जात्यात आहेत.
तीन तिघाडे,काम बिघाडे,
म्हणूनच गोत्यात आहेत.
धाकटे झाले थोरले,
थोरले आता धाकटे आहेत!
सत्ताधारी असूनही,
दिवस वाईट वकटे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-7885
दैनिक झुंजार नेता
29मार्च 2022
Monday, March 28, 2022
लोकभावना.... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
लोकभावना
तालुक्याला द्या जिल्ह्याला द्या,
फक्त मुंबईतच काय गल्लीत द्या.
जास्तच पुळका आला असेल तर,
एखादं घर राजधानी दिल्लीत द्या.
आमदारांना मुंबई घर देणार,
यावर प्रतिक्रिया जळजळीत आहेत !
लोकभावना त्यांना समजतील,
खऱ्या अर्थाने जे जे कळीत आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7884
दैनिक झुंजार नेता
28मार्च 2022
----------------------------
लोकभावना
तालुक्याला द्या जिल्ह्याला द्या,
फक्त मुंबईतच काय गल्लीत द्या.
जास्तच पुळका आला असेल तर,
एखादं घर राजधानी दिल्लीत द्या.
आमदारांना मुंबई घर देणार,
यावर प्रतिक्रिया जळजळीत आहेत !
लोकभावना त्यांना समजतील,
खऱ्या अर्थाने जे जे कळीत आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7884
दैनिक झुंजार नेता
28मार्च 2022
डायरीतल्या नोंदी... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
डायरीतल्या नोंदी
आपलेच दात असले तरी,
तोंड दाबून हसावे लागते.
जेव्हा 'मातोश्री' म्हणजे आई,
स्पष्टीकरण देत बसावे लागते.
संदर्भाशिवाय स्पष्टीकरण,
म्हणजे नियत साफ नाही !
'मातोश्री'कडे बोट दाखवायची,
कुणाच्या पिताश्रीत टाप नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6450
दैनिक पुण्यनगरी
28मार्च 2022
Sunday, March 27, 2022
कॉमन अजेंडा... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
कॉमन अजेंडा
किमान समान कार्यक्रम,
हा खूप विनोदी भाग आहे.
समान नसतो,किमान नसतो,
याचाच खरा राग असतो.
किमान समान कार्यक्रमात,
मित्रपक्षांचा कार्यक्रम होतो.
आपण सत्तेत की, सत्तेबाहेर?
वेळोवेळी हाच भ्रम होतो.
संयुक्त सरकार मध्ये,
हाच कॉमन अजेंडा असतो !
कुणाच्या हातामध्ये बुडखा,
कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6449
दैनिक पुण्यनगरी
27मार्च 2022
----------------------------
कॉमन अजेंडा
किमान समान कार्यक्रम,
हा खूप विनोदी भाग आहे.
समान नसतो,किमान नसतो,
याचाच खरा राग असतो.
किमान समान कार्यक्रमात,
मित्रपक्षांचा कार्यक्रम होतो.
आपण सत्तेत की, सत्तेबाहेर?
वेळोवेळी हाच भ्रम होतो.
संयुक्त सरकार मध्ये,
हाच कॉमन अजेंडा असतो !
कुणाच्या हातामध्ये बुडखा,
कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6449
दैनिक पुण्यनगरी
27मार्च 2022
धाडग्रस्त महाराष्ट्र... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
धाडग्रस्त महाराष्ट्र
टाका धाडी, घाला आत,
जर हाच अजेंडा छुपा असेल.
तर उद्या महाराष्ट्र विधिमंडळात,
'जेल रिटर्न' चा ताफा असेल.
कुणी ईडीग्रस्त आहे,
कुणी इन्कम टॅक्सग्रस्त आहे!
वर्तमान आणि भविष्य बघून,
सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7883
दैनिक झुंजार नेता
27मार्च 2022
----------------------------
धाडग्रस्त महाराष्ट्र
टाका धाडी, घाला आत,
जर हाच अजेंडा छुपा असेल.
तर उद्या महाराष्ट्र विधिमंडळात,
'जेल रिटर्न' चा ताफा असेल.
कुणी ईडीग्रस्त आहे,
कुणी इन्कम टॅक्सग्रस्त आहे!
वर्तमान आणि भविष्य बघून,
सगळा महाराष्ट्र मात्र त्रस्त आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7883
दैनिक झुंजार नेता
27मार्च 2022
Saturday, March 26, 2022
फोटोलॉजी...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
फोटोलॉजी
चिम्या,गोम्या आणि सोम्या,
एकमेकांना ओवाळू लागले.
सत्काराचा एकच हार,
आळी-पाळीने माळू लागले.
तिघांनाही तिघांचे,
बघा कौतुक तरी किती आहे?
चिम्याकडून गोम्याची,
गोम्याकडू सोम्याची स्तुती आहे.
हे चिम्या,गोम्या आणि सोम्या,
तुमच्याकडेसुद्धा असू शकतात!
कुठेच नाही दिसले तर,
सोशल मीडियावर दिसू शकतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6448
दैनिक पुण्यनगरी
26मार्च 2022
----------------------------
फोटोलॉजी
चिम्या,गोम्या आणि सोम्या,
एकमेकांना ओवाळू लागले.
सत्काराचा एकच हार,
आळी-पाळीने माळू लागले.
तिघांनाही तिघांचे,
बघा कौतुक तरी किती आहे?
चिम्याकडून गोम्याची,
गोम्याकडू सोम्याची स्तुती आहे.
हे चिम्या,गोम्या आणि सोम्या,
तुमच्याकडेसुद्धा असू शकतात!
कुठेच नाही दिसले तर,
सोशल मीडियावर दिसू शकतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6448
दैनिक पुण्यनगरी
26मार्च 2022
Friday, March 25, 2022
युद्धाचे ढग....मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
युद्धाचे ढग
कुणाचे मिसाईल फुसके,
कुणाचे मोघम निघू लागले.
सगळे मिसाईल मॅन,
ढगात मिसाईल डागू लागले.
राजकीय युद्धाचे ढग,
आपल्यावरती दाटू लागले!
कुणी कुणाला झेलेनस्की,
तर कुणी पुतीन वाटू लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6447
दैनिक पुण्यनगरी
25मार्च 2022
----------------------------
युद्धाचे ढग
कुणाचे मिसाईल फुसके,
कुणाचे मोघम निघू लागले.
सगळे मिसाईल मॅन,
ढगात मिसाईल डागू लागले.
राजकीय युद्धाचे ढग,
आपल्यावरती दाटू लागले!
कुणी कुणाला झेलेनस्की,
तर कुणी पुतीन वाटू लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6447
दैनिक पुण्यनगरी
25मार्च 2022
चडफड ते तडफड...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
चडफड ते तडफड
सत्तेसाठी वाट्टेल ते म्हणीत,
राजकीय बलिदान द्यावे लागते.
ज्यांचा आयुष्यभर दुस्वास केला,
त्यांनासुद्धा समजून घ्यावे लागते.
चडफड होते,तडफड होते,
सगळे गोड मानून घ्यावे लागते!
कितीही उपेक्षा झाली तरी,
अपेक्षाभंगाला कोळून प्यावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7882
दैनिक झुंजार नेता
25मार्च 2022
----------------------------
चडफड ते तडफड
सत्तेसाठी वाट्टेल ते म्हणीत,
राजकीय बलिदान द्यावे लागते.
ज्यांचा आयुष्यभर दुस्वास केला,
त्यांनासुद्धा समजून घ्यावे लागते.
चडफड होते,तडफड होते,
सगळे गोड मानून घ्यावे लागते!
कितीही उपेक्षा झाली तरी,
अपेक्षाभंगाला कोळून प्यावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7882
दैनिक झुंजार नेता
25मार्च 2022
Thursday, March 24, 2022
अटळ सत्य.... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
अटळ सत्य
राजकीय घराणेशाहीला,
भाऊबंदकीने गाठले म्हणतो.
अत्यंत दुःखद अंतकरणाने,
त्यांचे घराणे फुटले म्हणतो.
त्यांची तहान भागली जाते,
त्यांचीच भूक भागली जातो.
घराण्यातल्या घराण्यातच,
राजकीय सत्ता विभागली जाते.
काहीही झाले तरी,
घराणेशाही टळलेली नाही !
जे हे सत्य नाकारतात,
त्यांना घराणेशाही कळलेली नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7881
दैनिक झुंजार नेता
24मार्च 2022
----------------------------
अटळ सत्य
राजकीय घराणेशाहीला,
भाऊबंदकीने गाठले म्हणतो.
अत्यंत दुःखद अंतकरणाने,
त्यांचे घराणे फुटले म्हणतो.
त्यांची तहान भागली जाते,
त्यांचीच भूक भागली जातो.
घराण्यातल्या घराण्यातच,
राजकीय सत्ता विभागली जाते.
काहीही झाले तरी,
घराणेशाही टळलेली नाही !
जे हे सत्य नाकारतात,
त्यांना घराणेशाही कळलेली नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7881
दैनिक झुंजार नेता
24मार्च 2022
आर्थिक सल्ला... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
आर्थिक सल्ला
कोण म्हणतो ईडीच्या धाडींचे,
काहीच परिणाम होणार नाहीत?
इथून पुढे सोयरे-धायरे कधीच,
उसने पैसे मागायला येणार नाहीत.
विनाकारण दिले तरी मरण आहे,
विनातारण दिले तरी मरण आहे.
बायकोचा भाऊ आला तरी,
घाबरायचे काय कारण आहे?
मातोश्री ची शपथ घेवून,
त्यांना पुढचा धोका जाणवू शकता!
बायकोच्या भावालासुद्धा,
वाट्टेल तेव्हा ' मामा ' बनवू शकता !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6446
दैनिक पुण्यनगरी
24मार्च 2022
----------------------------
आर्थिक सल्ला
कोण म्हणतो ईडीच्या धाडींचे,
काहीच परिणाम होणार नाहीत?
इथून पुढे सोयरे-धायरे कधीच,
उसने पैसे मागायला येणार नाहीत.
विनाकारण दिले तरी मरण आहे,
विनातारण दिले तरी मरण आहे.
बायकोचा भाऊ आला तरी,
घाबरायचे काय कारण आहे?
मातोश्री ची शपथ घेवून,
त्यांना पुढचा धोका जाणवू शकता!
बायकोच्या भावालासुद्धा,
वाट्टेल तेव्हा ' मामा ' बनवू शकता !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6446
दैनिक पुण्यनगरी
24मार्च 2022
Wednesday, March 23, 2022
चौकशीचा सार...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
चौकशीचा सार
ज्यांची सोय व्हायला हवी,
त्यांची गैरसोय व्हायला लागली.
सत्तेच्या सोयाऱ्या-धायऱ्यावर,
टाचेवर टाच यायला लागली.
सोयरे-धायरे,पाहुणे-रावळे,
यांचाच आता पाहुणचार आहे !
नात्यामुळे गोत्यात आले,
चौकशीअंती हाच सार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6445
दैनिक पुण्यनगरी
23मार्च 2022
मुखवटाधारी चेहरे...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ---------------------------- मुखवटाधारी चेहरे खरेपणाने जगता येत नाही, म्हणून लोक खोटेपणाने जगतात. तो असतो मुखवटा, लोक ज्याला चेहरा म्हणून बघतात. आज सारेच चेहरे इथे, मुखवट्याने झाकलेले आहेत ! यातच सुख समाधान आहे, लोकही समजून चुकलेले आहेत ! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 --------------------------------------- फेरफटका-7880 दैनिक झुंजार नेता 23मार्च 2022
Tuesday, March 22, 2022
फाईल्स.... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
फाईल्स
क्लोज केलेल्या फाईली,
नव्याने ओपन होवू लागल्या.
दूरचे पाखरू टिपण्यासाठी,
फाईली गोफण होऊ लागल्या.
फायलींचा गोफणगुंडा बघून,
पक्षा-पक्षात खळबळ आहे!
ओठावर कळवळा असका तरी,
पोटात मात्र मळमळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7879
दैनिक झुंजार नेता
22मार्च 2022
गोबेल्सची घुसखोरी....मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
गोबेल्सची घुसखोरी
मीडिया ते सोशल मीडिया,
अगदी सर्वत्रच बसले आहेत.
छोट्या- मोठ्या पडद्यावरही,
आता गोबेल्स घुसले आहेत.
गोबेल्स नीती जशी,
पॉलिटिकल पार्ट झाली आहे.
तशी गोबेल्स नीती आता,
क्रिएटिव्ह आर्ट झाली आहे.
फेकालॉजी आणि ठोकालॉजी,
यावर त्यांचा विश्वास गाढ असतो!
गोबेल्स पडद्यावर असेल तर,
हिटलर नक्की पडद्या आड असतो!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6444
दैनिक पुण्यनगरी
22मार्च 20222022
Monday, March 21, 2022
'विमान'दारी.... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
'विमान'दारी
जुनेच रान पुन्हा,
नव्याने उठवले जाते
पुष्पक विमान आणून,
तुकोबांना सदेह
वैकुंठाला पाठवले जाते.
भाबड्या श्रद्धेपोटी,
पुन्हा जुनेच वर्तन आहे.
शाब्दिक प्रामाण्याचे,
पुन्हा पुन्हा कीर्तन आहे.
वैकुंठगमनाची चिकित्सा,
सोयीस्कर टाळली जाते!
जशी पाळता येईल तशी,
विमानदारी पाळली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6442
दैनिक पुण्यनगरी
21मार्च 2022
----------------------------
'विमान'दारी
जुनेच रान पुन्हा,
नव्याने उठवले जाते
पुष्पक विमान आणून,
तुकोबांना सदेह
वैकुंठाला पाठवले जाते.
भाबड्या श्रद्धेपोटी,
पुन्हा जुनेच वर्तन आहे.
शाब्दिक प्रामाण्याचे,
पुन्हा पुन्हा कीर्तन आहे.
वैकुंठगमनाची चिकित्सा,
सोयीस्कर टाळली जाते!
जशी पाळता येईल तशी,
विमानदारी पाळली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6442
दैनिक पुण्यनगरी
21मार्च 2022
Sunday, March 20, 2022
लिटमस टेस्ट...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
लिटमस टेस्ट
हेही जसे लोफर आहेत,
तेही तसे लोफर आहेत.
अविश्वसनीय वाटणाऱ्या,
परस्परांना ऑफर आहेत.
मतभेद टाळा,
खुशाल राजकारण खेळा,
हे मात्र एकदम बेस्ट आहे.
सामान्य जनतेचीच,
जणू ही लिटमस टेस्ट आहे .
विश्वास नावाची गोष्ट,
कधीच पायदळी तुडवली आहे!
जनतेची पहाटेची झोप,
कायमचीच उडवली आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6441
दैनिक पुण्यनगरी
20मार्च 2022
तहनामा....मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
तहनामा
इनकमिंग आणि आउटगोइंग,
हा राजकारणाचाच भाग आहे.
येता-जाता जी सौदेबाजी होते,
त्याचाच खरा जनतेला राग आहे.
तडजोडशिवाय राजकारणच नाही,
म्हणूनच तर त्यांना हा मोह असतो !
आपल्यासाठी असते ती सौदेबाजी,
राजकारण्यांसाठी हा तह असतो!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7877
दैनिक झुंजार नेता
20मार्च 2022
Friday, March 18, 2022
हास्य कवी संमेलन...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
----------------------------
हास्य कवी संमेलन
कुणी चक्क मालक झाले,
कुणी त्यांचे नोकर झाले.
मानधनाच्या पुडक्यापोटी,
कवी लोक जोकर झाले.
कविता त्यांचा वसा नाही ,
कविता त्यांचा षोक आहे.
त्यांच्या हास्य कविता म्हणजे,
जोक मागून जोक आहे.
रंगबाजी आहे, ढंगबाजी आहे
तमाशाबरोबर बतावणी आहे.
कविता म्हणजे चकणा झाली,
पेताडांची पेताडांना,
क्या बात है..ची चिथावणी आहे.
बगलेत आणि पोटाला नको,
जरा मेंदूलाही गुदगुल्या करा !
फक्त हसवा-फसवी करण्यापेक्षा,
लोकरंजनातून लोकप्रबोधनासाठी
आपल्या कविता खुल्या करा!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7876
दैनिक झुंजार नेता
18मार्च 2022
बुरा न मानो....मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
------------------------
बुरा न मानो....
जिकडे तिकडे बोंबाबोंब,
आपली तूप, आपलीच पोळी आहे.
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे.
विरोधात बोलल्यावर धाड,
विचारवंतांना तर गोळी आहे.
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे.
जनतेला वेठीस धरून,
आपापली राजकीय खेळी आहे.
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे.
हेही म्हातारे,तेही म्हातारे,
खुर्ची पाहून गाली खळी आहे.
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे.
कशा कशाला आणायचा उत?
सगळी कढीच शिळी आहे!
बुरा न मानो,
आता वर्षभरच होळी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6440
दैनिक पुण्यनगरी
18मार्च 2022
Thursday, March 17, 2022
चोर बाजार...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
------------------------
चोर बाजार
सावांनाही पश्चाताप व्हावा,
असे अनुभव येऊ लागले.
चोरांसारखे चोरही,
हल्ली प्रतिष्ठा पावू लागले.
कुणी अट्टल दरोडेखोर,
कुणाची चोरी भुरटी आहे!
चोर झाले झाले प्रतिष्ठित,
सावांची नजर चोरटी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7875
दैनिक झुंजार नेता
17मार्च 2022
------------------------
चोर बाजार
सावांनाही पश्चाताप व्हावा,
असे अनुभव येऊ लागले.
चोरांसारखे चोरही,
हल्ली प्रतिष्ठा पावू लागले.
कुणी अट्टल दरोडेखोर,
कुणाची चोरी भुरटी आहे!
चोर झाले झाले प्रतिष्ठित,
सावांची नजर चोरटी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7875
दैनिक झुंजार नेता
17मार्च 2022
चोर ते चोर....मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
------------------------
चोर ते चोर....
विरोधकांकडे बोट दाखवून,
जो तो मिरवतोय टेंभा.
तुम्हीच सांगा आता,
कुणाच्या नावाने मारायच्या बोंबा?
सगळीकडे बोंबाबोंब तरी,
बोंबा मारायच्या नावाने चोरी आहे.
सगळ्याच चोरांची मिळून,
एकमेकांवरती शिरजोरी आहे.
जनतेच्या मनगटावर,
नेहमी राजकारण्यांचा चुना आहे !
बरेच काही गिळून गप्प बसते,
हा सामान्य जनतेचा गुन्हा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6439
दैनिक पुण्यनगरी
17मार्च 2022
-------------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) वैयक्तिक अभिप्राय दिल्यास उत्तम.
जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 17 हजारांहून जास्त वात्रटिकापैकी 7 हजार वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
5) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
6) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 ) माझे आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
9)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
10) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
11) *दैनिक* *वात्रटिका* चे आजपर्यंतचे सर्व अंक वाचण्यासाठी क्लिक करा
https://suryakantdolase.blogspot.com
-सूर्यकांत डोळसे
17मार्च 2022
---------------------------------
#आजची_वात्रटिका
#मराठी_वात्रटिका
#सूर्यकांती_लाईव्ह
*मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 17 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका....*
------------------------
चोर ते चोर....
विरोधकांकडे बोट दाखवून,
जो तो मिरवतोय टेंभा.
तुम्हीच सांगा आता,
कुणाच्या नावाने मारायच्या बोंबा?
सगळीकडे बोंबाबोंब तरी,
बोंबा मारायच्या नावाने चोरी आहे.
सगळ्याच चोरांची मिळून,
एकमेकांवरती शिरजोरी आहे.
जनतेच्या मनगटावर,
नेहमी राजकारण्यांचा चुना आहे !
बरेच काही गिळून गप्प बसते,
हा सामान्य जनतेचा गुन्हा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6439
दैनिक पुण्यनगरी
17मार्च 2022
-------------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.
2)सदरील वात्रटिकांमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला त्वरित कळवा.
3) वैयक्तिक अभिप्राय दिल्यास उत्तम.
जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 17 हजारांहून जास्त वात्रटिकापैकी 7 हजार वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
5) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
6) वात्रटिकांविषयी सर्व काही एकाच वेळी...एकाच ठिकाणी !! अर्थात *साप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती Live* या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 ) माझे आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
9)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
10) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
11) *दैनिक* *वात्रटिका* चे आजपर्यंतचे सर्व अंक वाचण्यासाठी क्लिक करा
https://suryakantdolase.blogspot.com
-सूर्यकांत डोळसे
17मार्च 2022
---------------------------------
#आजची_वात्रटिका
#मराठी_वात्रटिका
#सूर्यकांती_लाईव्ह
*मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 17 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका....*
Wednesday, March 16, 2022
कच्चे तेल... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
------------------------
कच्चे तेल
रशिया आणि युक्रेन युद्धाचे,
अटळ परिणाम होऊ लागले.
ज्याला आपण कच्चे खायचे,
ते आपल्याला कच्चे खाऊ लागले.
पेट्रोल आणि डिझेलच्या आगीत,
खायचे तेल पडले हे सिद्ध आहे!
युद्ध नको,शांतता हवी,
असे म्हणणारा मात्र हतबुद्ध आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6438
दैनिक पुण्यनगरी
16मार्च 2022
------------------------
कच्चे तेल
रशिया आणि युक्रेन युद्धाचे,
अटळ परिणाम होऊ लागले.
ज्याला आपण कच्चे खायचे,
ते आपल्याला कच्चे खाऊ लागले.
पेट्रोल आणि डिझेलच्या आगीत,
खायचे तेल पडले हे सिद्ध आहे!
युद्ध नको,शांतता हवी,
असे म्हणणारा मात्र हतबुद्ध आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6438
दैनिक पुण्यनगरी
16मार्च 2022
फिट्टम फाट.... मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
------------------------
फिट्टम फाट
सत्तेवर असले की,
सत्तेच्या तोऱ्यात असतात.
पायउतार झाले की,
चौकशीच्या घेऱ्यात असतात.
कुणी जातात आत,
कुणी मात्र बाहेर असतात !
फिट्टम फाट वाटावेत असे,
चौकश्यांचे आहेर असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7874
दैनिक झुंजार नेता
16मार्च 2022
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...