आजची वात्रटिका
--------------------------
तिकीट... तिकीट...
पक्ष प्रेम असो वा नसो,
खोटे का होईना दिसावे लागते.
उमेदवारी म्हटले की,
हातात तिकीट असावे लागते.
विदाऊट तिकीटाच्या प्रवासात,
संकटावर संकटं बेतली जातात !
म्हणून तर पक्षांची तिकीटं,
वाट्टेल त्या भावाने घेतली जातात !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4265
दै.झुंजार नेता
19 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment