आजची वात्रटिका
-------------------------
स्वातंत्र्यानंतरची
कमाई
ठकास भेटले महाठक,
सारेच दोस्त झाले.
नेत्यांची कमतरता,
राजकारणीच जास्त झाले.
समाज पुढे न्यायचा तर,
स्वतःचीच पुढे वाटचाल आहे !
त्यांनी देश असा खाल्ला की,
आपल्याच बापाचा माल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2783
दैनिक पुण्यनगरी
19 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment