Thursday, November 19, 2026

निषेधाची फोटोलॉजी .. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

निषेधाची फोटोलॉजी

निषेधाचा राजकीय  फंडा बघा, 
किती धाड धाड सुरू आहे.
पुस्तके आणि फोटोंचीही
सर्वत्र फाडाफाड सुरू आहे.

निषेधाच्या शायना मारता मारता, 
नको तोच प्रकार घडला गेला. 
पाहिजे तो फोटो फाडता फाडता, 
नको तोच फोटो फाडला गेला.

कशात काय अन् फाटक्यात पाय,
फक्त एवढाच इशारा काफी आहे !
ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या तोंडी,
फक्त माफी एके माफी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9461
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
19 नोव्हेंबर 2026
----------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा 
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा





No comments:

मुक्ताफळे... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- मुक्ताफळे चपला खावून सुध्दा, ते पुन्हा बकले. लावलेल्या आगीत, त्यांनीच पेट्रोल टाकले. सावर...