Saturday, April 30, 2022

पॉलिटिकल अफेअर...मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

---------------------

पॉलिटिकल अफेअर

राजकीय आघाड्या म्हणजे,
खरे तर लव्ह अफेयर असते.
सत्तेसाठी देवाण - घेवाण होते
त्यांच्यात सत्ता शेअर असते.

हेतू उघड असेल तरी,
चेहऱ्यावर मेकअप असतो !
जेव्हा पटत नाही तेव्हा,
त्यांचा जाहीर ब्रेक अप असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7916
दैनिक झुंजार नेता
30एप्रिल2022

सेव्ह अर्थ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सेव्ह अर्थ

पुस्तकी पर्यावरण रक्षणाचे,
आपले केवळ पारायण आहे.
हाफ सेंच्यूरी मारायच्या तयारीत,
आपला सूर्यनारायण आहे.

झाडे लावा, झाडे जगवा,
अप्रामाणिक ओरड आहे.
खोल खोल गेले पाणी,
बोअरच्या घशाला कोरड आहे.

पाणी आडवा,पाणी जिरवा,
आपल्याला कुठे पुरती जाग आहे?
स्वतःला वाचवायचे असेल तर,
पृथ्वी वाचविणे भाग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6463
दैनिक पुण्यनगरी
30एप्रिल2022

 

Friday, April 29, 2022

एकाकी सत्य...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

एकाकी सत्य

कितीही शोधले तरी,
का सत्य दिसत नाही?
खोटेपणा लपून करावा,
हेही पथ्य दिसत नाही.

मी खोट्यास विचारले,
एवढा का मस्तीत आला?
एकच गाजावाजा मग,
सगळ्या वस्तीत झाला.

खोट्याला खोटे म्हणू नका,
इथे खोट्याला धोका नाही!
सत्य सत्य असेल तरी,
कुणीही पाठीराखा नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6462
दैनिक पुण्यनगरी
29एप्रिल2022

 

काळी दुनिया... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

काळी दुनिया

जिथे जिथे शिते आहेत,
तिथे तिथे भूतं नाचू लागली.
वेताळाची आरती,
सगळ्यांनाच रूचू लागली.

आपल्या आरत्या ऐकून
हल्ली वेताळ खुश होतो.
लाचार हडळी पाहून
हल्ली वेताळास जोश येतो.

लाचाच हडळी अन,
भुतं दिमतीला आहेत !
काळ्या दुनियेतील आत्मे,
सैतानाच्या गमतीला आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7915
दैनिक झुंजार नेता
29एप्रिल2022

 

Thursday, April 28, 2022

नवरदेवांनो...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

नवरदेवांनो...

आवाज वाढव डीजे...
तुला आईची शपथ हाय.
लग्नाआधीच बायको गेली तर?
मग सांगा करायचे काय?

उदाहरणासहित सांगतो,
हा प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो.
डिजेवर नाचता नाचता,
मित्राचा जीवही जाऊ शकतो.

मुहूर्त काढला तर तो पाळा,
वेळेत मंडपात पोहोचायचे आहे!
लग्नानंतर बायकोच्या तालावर,
आयुष्यभर नाचायचे आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6461
दैनिक पुण्यनगरी
28एप्रिल2022

 

खोट...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

खोट

गुन्हे खोटे,पंचनामे खोटे,
अजून काय काय खोटे?
वार खोटे,जखमा खोट्या,
मिळालेले न्याय खोटे?

बाता खोट्या,बढाया खोट्या,
तावा तावाच्या चढाया खोट्या!
जिंकल्याचे दावे जिथले,
दुर्दैवाने त्या लढाया खोट्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7913
दैनिक झुंजार नेता
28एप्रिल2022

 

Wednesday, April 27, 2022

निराशेची वर्दी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

निराशेची वर्दी

आपल्याला वाटते प्रबोधनाने,
सगळे लोक जागे झाले आहेत.
यातले वास्तव असे आहे की,
लोक फक्त बघे झाले आहेत.

जिकडे बघावे तिकडे,
आज बघ्यांची भाऊगर्दी आहे!
आशा पल्लवित होण्याआधीच,
मागून निराशेची वर्दी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7912
दैनिक झुंजार नेता
27एप्रिल2022

 

daily vatratika...29jane2026