Sunday, January 16, 2022

इन्स्टंट श्रीमंती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

इन्स्टंट श्रीमंती

कुठे आहे डबल धमाका,
कुठे पैशाचा पाऊस आहे.
विकतचा गंडा घालून घ्यायाची,
गुंतवणूकदारांना हौस आहे.

पुढच्यास ठेच बसली तरी,
मागच्यांचे ते चालूच आहे !
इन्स्टंट श्रीमंत होण्याची,
तुम्हाला आम्हाला लालूच आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6380
दैनिक पुण्यनगरी
16जानेवारी 2022

 

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...