Monday, January 3, 2022

सावित्री...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

सावित्री

सावित्री हा इतिहास आहे,
सावित्री म्हणजे भाकडकथा नाही.
अत्यंत लोकविलक्षण असली तरी,
पारायण करायला ती गाथा नाही.

सावित्री सतत वाचली पाहिजे,
सावित्री सहज पचली पाहिजे.
सावित्री कुणालाही रुचेल,
सावित्री खोलवर पोचली पाहिजे.

जिथे पोहोचला सत्यधर्म,
तिथे परिवर्तन झालेच समजा!
जिथे जिथे पोहोचली सावित्री,
तिथे तिथे ज्योतिबा आलेच समजा!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7805
दैनिक झुंजार नेता
3जानेवारी 2022

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...