Thursday, January 6, 2022

प्रतिमा आणि प्रतिमान...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

प्रतिमा आणि प्रतिमान

क्षणापूर्वीचे जे ताजे होते,
क्षणानंतर ते शिळे होते.
बातमी फुटते बातमी,
बातमीलाही मग जुळे होते.

लागू लागून काय?
त्याला फक्त इंटरनेट लागते.
आजकाल लोकांनासुद्धा,
सगळे अगदी थेट लागते.

पत्रकारिता गतिमान झाली,
तशी नीतिमान होत राहो !
लोकमनात तिची प्रतिमा,
सतत प्रतिमान होत राहो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6374
दैनिक पुण्यनगरी
6जानेवारी 2022

 

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...