Sunday, January 9, 2022

कोरोनाचा ॲक्शन रिप्ले...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
कोरोनाचा ॲक्शन रिप्ले
कुणासाठी कोरोना खाऊ आहे,
कुणासाठी कोरोना बाऊ आहे.
लॉक डाऊनच्या सावटामुळे,
कोरोना म्हणजे नाकी नऊ आहे.
लॉक डाऊनच्या निर्णयावर,
कुठे सहमती,कुठे वाद आहेत !
कोरोनाच्या बदलत्या रूपापुढे,
वाद-विवादसुद्धा बाद आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7810
दैनिक झुंजार नेता
9जानेवारी 2022

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...