Tuesday, January 18, 2022

बौद्धिक दिवाळखोरी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

बौद्धिक दिवाळखोरी

फसविणाऱ्यापेक्षाही आम्हांला,
फसणारांचाच खरा राग येतो.
जे फसले त्यांची कीव आली तरी,
त्यांची टर उडविण्यास भाग होतो.

फसलेल्यांवर हसावे की रडावे?
दोन्हीही गोष्टींची चोरी असते!
फसविणारांची हरामखोरी तर,
फसलेल्यांची दिवाळखोरी असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7819
दैनिक झुंजार नेता
18जानेवारी 2022

 

No comments:

daily vatratika...21sept2024