Monday, January 3, 2022

सबलीकरणाचे अपचन....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

सबलीकरणाचे अपचन

आर्थिक सबलता आली तरी,
बौद्धिक दुर्बलता वाढत आहे.
दुर्बलता वाढत चालल्याने,
मानसिक निर्बलता वाढत आहे.

महिला आर्थिक सबलतेचे,
मानसिक सबलतेशी नाते आहे.
राजकीय सबलीकरण तर,
नात्या-नात्यातच गोते खाते आहे.

महिला सबलीकरण झाले तरी,
ते सर्वांग सुंदर जाणवत नाही !
मानसिक दुर्बलता एवढी की,
सबलीकरणसुद्धा मानवत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6371
दैनिक पुण्यनगरी
3जानेवारी 2022

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...