Wednesday, January 26, 2022

कोरोनासत्ताक राज्य...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनासत्तक राज्य
कोरोनाविरुद्ध लढायला,
सारे जग सज्ज आहे.
तरीसुद्धा सर्व जगावरती,
कोरोनाचेच राज्य आहे.
जात,धर्म,लिंग,भाषा,
हा भेद आपल्यापुरता आहे.
जणू जगव्यापी कोरोना तर,
लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे.
जगणे कारोनाविना नाही,
जगणे कोरोनासह आहे !
नाक मुठीत धरून,
आपला कोरोनाशी तह आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
26जानेवारी 2022

 

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...