Friday, January 14, 2022

कोरोनाची संक्रांत.. मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------------

कोरोनाची संक्रांत

कशावरच बसणार नाही,
ती संक्रांत कसली आहे?
याही वर्षी संक्रांत,
कोरोनावरच बसली आहे.

डेल्टा नंतर मायक्रॉन,
संक्रांतीचे वाहन आहे.
तोंडावरती मास्क घालून,
कोरोनाचे वहन आहे.

चीनकडून चीनकडे,
संक्रांतीचा प्रवास आहे !
जगण्याची चालली धडपड,
कोंडलेला श्वास आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7815
दैनिक झुंजार नेता
14जानेवारी 2022

No comments:

कॉलेजकुमारांचा उद्वेग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कॉलेजकुमारांचा उद्वेग ज्यांना साधे शि-शु कळत नाही, तेसुद्धा एकदाचे शाळेत आले. यामुळे सगळे कॉलेज ...