Tuesday, January 4, 2022

चिंताजनक... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

चिंताजनक

नेत्यानंतर अभिनेत्यांना,
कोरोनाचा वेढा आहे.
तरीही बेफिकिरीचा,
पाढ्यावरती पाढा आहे.

ऐकणारे सुन्न आहेत,
बघणारेही सुन्न आहेत!
नेते आणि अभिनेत्यांचे,
पहिले पाढे पंचावन्न आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7806
दैनिक झुंजार नेता
4जानेवारी 2022

 

No comments:

daily vatratika...29jane2026