Saturday, January 29, 2022

इशारे..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

इशारे

कधी पक्षादेश पाळले जातात,
कधी नवे मार्ग चाळले जातात.
पक्षादेश टाळण्याचे इशारे येताच,
सरळ पक्षादेश टाळले जातात.

पाळापाळी आणि टाळाटाळी,
राजकीय चाली असू शकतात !
फक्त समजणारांच्याच,
हे इशारे डोक्यात घुसू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7829
दैनिक झुंजार नेता
29जानेवारी 2022

 

No comments:

भक्त सलामत तो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- भक्त सलामत तो... किती भोंदू बाबा आले गेले, ज्यांचे भांडे सतत फुटले आहे. भोंदू हे भोंदूच असतात, अ...