Thursday, January 13, 2022

नैसर्गिक दुःख.. मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
-----------------------------

नैसर्गिक दुःख

पावसाचा नाट आहे,
थंडीची लाट आहे.
अवकाळी निसर्गामुळे,
शेतकऱ्यांची वाट आहे.

कितीही बदलले तरी,
अदलाबदली झेपत नाही.
शेतकऱ्यांची माला माल,
दलालांनाही खपत नाही.

आपला हात जगन्नाथ,
सारे निसर्गाच्या हाती आहे!
निसर्गाच्या लहरीमुळे,
अन्नामध्ये माती आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7814
दैनिक झुंजार नेता
13जानेवारी 2022


No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...