Sunday, January 23, 2022

पराभव दर्शन...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पराभव दर्शन

कधीकधी शस्त्र पडतात गळून,
लढायचे असूनही लढता येत नाही.
आरोप एवढे मायावी की,
आरोपांचा शब्दही खोडता येत नाही.

तरीही तुम्ही हात-पाय गाळू नका,
खोट्या प्रलोभनावरती भाळू नका.
रडायचे तर एकांतात खुशाल रडा,
पण लोकांसमोर आसवं ढाळू नका

आसवं दिसतात,लोक हसतात,
त्यांच्यासाठी ती चांदी असू शकते !
तुमची हतबलता म्हणजेच,
त्यांच्या विजयाची नांदी असू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6387
दैनिक पुण्यनगरी
23जानेवारी 2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...