Wednesday, January 19, 2022

शरणागती... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

शरणागती

कुणासाठी पॅशन आहे,
कुणासाठी फॅशन आहे.
कुणासाठी आंदोलन म्हणजे,
दररोजचे रेशन आहे.

आंदोलन,मोर्चे,संप;
सगळी लढाई खोटी झाली.
कुणासाठी झाला धंदा,
कुणासाठी रोजी-रोटी झाली.

सगळ्या बंडलबाजीचे
बंडल हेच कारण आहेत !
लोकशाहीचे मार्ग असे,
भांडवलशाहीला शरण आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7820
दैनिक झुंजार नेता
19जानेवारी 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...