Thursday, January 6, 2022

साहेब..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

साहेब

इच्छा असली किंवा नसली तरी,
राजकारण घरात आणावे लागते.
जिथे बापाला बाप न म्हणता,
त्याला साहेब म्हणावे लागते.

नेता नसतो नवरा,भाऊ,बाप,
त्याला साहेबीपणा मिरवावा लागतो !
कौटुंबिक नात्या-गोत्यापेक्षा,
राजकीय प्रोटोकॉल गिरवावा लागतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7807
दैनिक झुंजार नेता
6जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...