Friday, January 7, 2022

सभ्यतेची ऐशीतैशी..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

सभ्यतेची ऐशीतैशी

आपला तो सभ्य,
दुसऱ्याचा तो असभ्य आहे.
हा दुहेरी मापदंड,
ज्याचा त्याला लभ्य आहे.

सर्वांचेच सभ्यतेशी,
प्रचंड मोठे दुरावे आहेत !
एकमेकांच्या असभ्यतेचे,
एकमेकांकडे पुरावे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7808
दैनिक झुंजार नेता
7जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...