Sunday, January 23, 2022

सावधानतेचा इशारा....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सावधानतेचा इशारा

दुरून डोंगर साजरे,
ही भेकडांची नीती वाटते.
भेकडांनी केलेल्या कौतुकाची,
आज-काल भीती वाटते.

जे असतात लबाड,
तेच खरे भेकड असतात.
पळकुटे इरादे त्यांचे,
पाठिंबेही भाकड असतात.

असे सारेच लबाड,
दुर्लक्षाच्या लायक असतात !
लबाडांचे दिलासेही,
सपशेल धोकादायक असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-7824
दैनिक झुंजार नेता
23जानेवारी 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...