Tuesday, January 25, 2022

कॉलेजकुमारांचा उद्वेग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

कॉलेजकुमारांचा उद्वेग

ज्यांना साधे शि-शु कळत नाही,
तेसुद्धा एकदाचे शाळेत आले.
यामुळे सगळे कॉलेज कुमार,
बघता बघता अस्वस्थ झाले.

कॉलेजकुमारांचा एकच उद्वेग,
हा अन्याय आम्ही कसा बघू शकतो?
एकजण पॉझिटिव्हली उद्गारला,
'व्हॅलेंटाईन डे'चा मुहूर्त निघू शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6389
दैनिक पुण्यनगरी
25जानेवारी 2022

 



No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...