Wednesday, January 5, 2022

स्वातंत्र्याची डेली डायरी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

स्वातंत्र्याची डेली डायरी

आपल्या लोकशाहीचे फळ,
इथे प्रत्येकाला भोगावे लागते.
जे हक्काने मिळाले पाहिजे,
ते भिकाऱ्यासारखे मागावे लागते.

लोक ठरले भिकारी,
भिकारी शिकारी बनले आहेत !
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षात,
विखारी दिवस आणले आहेत !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6373
दैनिक पुण्यनगरी
5जानेवारी 2022

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...