Thursday, January 13, 2022

लव्ह मराठी, सेव्ह मराठी.... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------------

लव्ह मराठी,सेव्ह मराठी

सेव्ह मराठी,सेव्ह मराठी,
स्वतःचा स्वतःशी लढा आहे.
मराठी भाषा संवर्धनासाठी,
आता खास पंधरवडा आहे.

शासकीय कार्यक्रमांचा,
परिणाम एकदम नगदी आहे.
ज्याच्यावर चालली घोडदौड,
ते घोडे तर कागदी आहे.

जेवढे वाचू-बोलू-लिहू मराठी,
तेवढे मराठीवर लव्ह होईल!
जगा मराठी,वागा मराठी,
मराठी आपोआप सेव्ह होईल!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6377
दैनिक पुण्यनगरी
13जानेवारी 2022

1 comment:

Unknown said...

खुप छान

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...