Sunday, January 2, 2022

दुःखद अनुभव..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

दुःखद अनुभव

नेत्यांना कोरोना नाही का?
या प्रश्नात काय उरले आहे.
मंत्री-संत्री आणि नेत्यांना,
आता कोरोनाने घेरले आहे.

देर आये दुरुस्त आये,
असे मात्र मुळीच वाटू नये
नेत्यांनी पाळावेत नियम,
कुणालाही उगीच खेटू नये.

आनंद घेरल्याचा नाही,
खरे दुःख बेफिकिरीचे होते !!
लोकांनो नियम पाळा,
हे म्हणणे जिकिरीचे होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6370
दैनिक पुण्यनगरी
2जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...