Saturday, January 29, 2022

सुपर..... मार्केट!....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सुपर..... मार्केट!

सगळ्या खातडा पेताडांची,
पुरती हौस फिटली आहे.
किराणा मालाच्या यादीत,
आता ब्रँडीची बाटली आहे.

मार्केटमध्ये वाइन मिळणार,
डोके तर खूप 'सुपर' आहे !
पिणारे पितील;खाणारे खातील,
सरकारच्या डोक्यावर खापर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
29जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...