Tuesday, January 11, 2022

काजव्यांची 'लुक' लुक..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

काजव्यांची 'लुक' लुक

काजव्यांना वाटू लागले,
आपणच फक्त उजवे.
सूर्याशीही स्पर्धा करती,
निशाचर क्षुद्र काजवे.

लुकलुकत्या काजव्यांचा,
लुक पटकन कळून जातो,
आमचा प्रकाश पाहून,
सूर्यही म्हणे पळून जातो.

आमचीच लाल आहे,
वस्तुस्थिती खरी आहे !!
ज्याची त्याची क्षमता,
जिथल्या तिथे बरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6375
दैनिक पुण्यनगरी
11जानेवारी 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...