Friday, January 21, 2022

निवडणूक विश्लेषण..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

निवडणूक विश्लेषण

ज्यांना नोटा उधळता येतात,
तेच गुलाल उधळू शकतात.
त्यांच्याच विजयाचे जयघोष,
कानावरती आदळू शकतात.

लपून छपून काहीच नाही,
सगळा मामला राजरोस आहे!
रात्रीच्या अंधाराला,
कुठे कुणाचा पायपोस आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7822
दैनिक झुंजार नेता
21जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...