Saturday, January 1, 2022

2022चे स्वगत...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

2022चे स्वगत

ते एक वीस होते,
मी बा,वीस आहे.
तेही कासा-वीस होते,
मीही कासावीस आहे.

तरीही माझे आगत आहे,
तरीही माझे स्वागत आहे.
तुम्हाला हे ऐकू यावे,
जरी हे माझे स्वगत आहे.

डेल्टा वा ओमायक्रॉन,
तोही बदलतोय गियर!
चला कोरोनालाही म्हणू,
डियर,हॅप्पी न्यू इयर !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6369
दैनिक पुण्यनगरी
1जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...