Wednesday, January 12, 2022

राष्ट्रमाता जिजाऊ.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

राष्ट्रमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ म्हणजे ,
मातृभक्तीच्या प्रतीक आहेत,
राजमाता जिजाऊ म्हणजे,
मातृशक्तीच्या प्रतीक आहेत.

राजमाता जिजाऊ म्हणजे,
स्वातंत्र्याच्या प्रेरणा आहेत.
राजमाता जिजाऊ म्हणजे,
स्वराज्याच्या धारणा आहेत.

राजमाता जिजाऊ म्हणजे,
सु संस्काराची कीर्ती आहेत.
राजमाता जिजाऊ म्हणजे,
सुराज्याच्या स्फूर्ती आहेत.

राजमाता जिजाऊ म्हणजे,
अन्यायाविरुद्धची चीड आहेत.
निश्चयाचे महामेरूसुद्धा,
दृढसंकल्पासाठी दृढ आहेत.

इतिहासाला जशा हव्या होत्या,
त्याहून आवश्यक आता आहेत!
जिजाऊ जशा राजमाता आहेत,
जिजाऊ तशा राष्ट्रमाता आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6376
दैनिक पुण्यनगरी
12जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -321 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1L7d09rSTvZKajObapVCl...