Thursday, January 20, 2022

स्थानिक राजकारण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

स्थानिक राजकारण

स्थानिक राजकारणात,
वेगळाच गफला असतो.
जो जो निवडून आला,
तो तो आपला असतो.

एकाचे असते चिन्ह,
दुसऱ्याचा टिळाअसतो !
नेतृत्वाच्या वर्चस्वाला,
सहमतीचा लळा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7821
दैनिक झुंजार नेता
20जानेवारी 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...