Sunday, January 9, 2022

बचेंगे तो.....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

बचेंगे तो.....

पुन्हा एकदा कोरोनापुढे,
दुर्दैवाने हात टेकावे लागले.
गजबजलेल्या शाळांना,
बंद करून टाकावे लागले.

निर्णय दुर्दैवी असला तरी,
तो अत्यंत अपरिहार्य आहे.
नसते धाडस करण्यात,
सांगा कसले शौर्य आहे?

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला,
ऑनलाइनचा आधार आहे !
बचेंगे तो और भी लढेंगे,
हाच संयमी निर्धार आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6374
दैनिक पुण्यनगरी
9जानेवारी 2022

 

No comments:

उमेदवारीचे मायाजाल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उमेदवारीचे मायाजाल कोणत्याही निवडणुकीमध्ये, एक चालूपणा नक्की केला जातो. नाव सारखे असणारा उमेदवार, ...