Saturday, January 22, 2022

आजची वात्रटिका...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

डबल रोल

भूमिका जगल्याशिवाय म्हणे,
भूमिका साकारता येत नाही.
आजच्यापुढे कालची,
भूमिका नाकारता येत नाही.

पाठराखणीवाले ऐरे गैरे नाहीत,
किंवा कुणी नत्थू खैरे नाहीत.
ऐकणार्‍यांना चांगले ऐकू येतेय,
सगळेच काही बहिरे नाहीत.

आपला तो अमोल आहे,
दुसऱ्याचे ते पोंक्षे आहेत !
म्हणायचे तर खुशाल म्हणा,
कोल्ह्याला आंबट द्रांक्षे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7823
दैनिक झुंजार नेता
22जानेवारी 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...