Friday, January 21, 2022

तुका आकाशा एवढा


आजची वात्रटिका
________________

तुका आकाशा एवढा

तुकोबा, आता तुम्हीच सांगा 
ते विमान कसले होते?
कोण होते ते पुण्यवान?
ज्यांना विमान दिसले होते.

आम्ही वारसदार त्या करंट्यांचे 
जे विमान पाहू शकले नाही
श्रद्धेशिवाय खरा पुरावा
कोणीच देवू शकले नाही.

तुकोबा तुमचे आभाळाएवढे कर्तृत्व 
विमानात बसूच शकत नाही!
इंद्रायणीच्या डोहातले सत्य
तपासल्याविना दिसूच शकत नाही!!

-सूर्यकांत डोळसे,
   पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-1816 
दै.पुण्यनगरी 
12मार्च2009

No comments:

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 281 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dveje...