Friday, January 7, 2022

नाटकाचा तमाशा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

नाटकाचा तमाशा

राजकारणाला नाटकाची,
भलतीच चटक आहे.
तमाशा रंगवण्यासाठी
राजकीय नाटक आहे.

राजकीय नाटकांची,
राजकीय नांदी आहे.
सूत्रधार बघत राहतो,
कुठे कुठे संधी आहे?

पेंद्या आणि मावशी,
आजकाल बेजार आहे!
मथुरा गेली पाण्यात,
वेड्यांचा बाजार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6372
दैनिक पुण्यनगरी
7जानेवारी 2022

 

No comments:

daily vatratika...29jane2026